थोडेसे आमच्या विषयी

ब्राह्मण सेवा संघ, गोरेगाव संचालित lagnkara.com या विवाह विषयक संकेत स्थळावर आपले स्वागत आहे. lagnkara.com या संकेत स्थळाचे व्यवस्थापन ब्राह्मण सेवा संघ संचालित "वधू -वर सूचक मंडळाद्वारे" केले जाते. अनेक वर्षांपासून ब्राह्मण सेवा संघ सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत आहे.

ब्राह्मण सेवा संघ, गोरेगाव संचालित "वधू-वर सूचक मंडळ" २००७ पासून कार्यरत असून सुरुवातीस हे मंडळ फक्त ब्राह्मण वधू-वरांसाठी कार्यान्वित होते. परंतु अलीकडे समाजातील विविध वर्गांतून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही, मंडळाची कार्य-कक्षा वाढवून, हे व्यासपीठ समस्त मराठी वर्गासाठी खुले करीत आहोत.

पारंपारिक कार्य-पद्धतीनुसार पालक मंडळात येऊन आपल्या मुला-मुलींसाठी योग्य जोडीदार निवडत. बहुतांश वधू-वर हे नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्याकारणाने त्यांना कार्यालयास भेट देणे सोयेचे होत नसे त्यात वाहतुकीचे नियमन करून कार्यालयीन वेळ पाळणे म्हणजे तारेवरची कसरत... असल्या अनेक अडचणी व बाबी लक्षात घेऊन मंडळाने संकेत स्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज यशस्वीरीत्या आपल्या सेवेत रुजू झाले आहे. संकेतस्थळाद्वारे पालक व वधू-वर जगाच्या पाठीवर कुठेही असल्यास आपला जोडीदार निवडू शकतात. आजवर मंडळातील अनेकांना अनुरूप जोडीदार मिळाला आहे. या संकेत स्थलाद्वारे आम्ही तुमच्या घरात पोहोचत आहोत.

संकेत-स्थळाबरोबर मंडळाचे पारंपारिक पद्धतीनेही कार्य चालू राहील.

 

वधू-वर सूचक मंडळाचे इतर उपक्रम -

१. विवाह पुर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन

२. विवाहेच्छूंच्या पालकांशी संवाद

३. वधू-वर मेळावे भरवणे

४. पत्रिका गुणमेलन पाहणे

 

नोंदणी -

१. सर्व वर्गातील महाराष्ट्रीय वधू-वरांसाठी नोंदणी खुली आहे.

२. वधुचे वय किमान १८ आणि वराचे वय किमान २१ असणे आवश्यक आहे.

३. संकेत स्थळाची नोंदणी वैयक्तिक सभासद स्वरूपातच असेल . कोणताही गट किंवा संस्था सभासद होऊ शकत नाही.

४. भारतीय दंड विधानाच्या कोणत्याही कलमाखाली गुन्हेगार मानल्या गेलेल्या व्यक्तीस सभासदत्व दिले जाणार नाही.

 

नोंदणी कशी कराल ?

नोंदणी करू इच्छिणारी व्यक्ती online अर्जाद्वारे नोंदणी करू शकते. online नोंदणी केल्यास धनादेश/RTGS चा तपशील व वधू/वराचे नाव e-mail द्वारे कळवावे.

किंवा

वधुवर सूचक मंडळाला समक्ष भेटून अर्ज भरून नोंदणी करू शकते.

एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

 

 

©Brahman Seva Sangh, Goregaon(W), Mumbai . All rights reserved.

Solution by Varsha Softline