नियम व अटी -
१. हे संकेत स्थळ फक्त जोडीदार निवडण्यासाठी आहे. या संकेत स्थळाचा उपयोग कोणत्याही
व्यावसायिक कामासाठी, जाहिरातीसाठी करता येणार नाही. तशा प्रकारची कृति हा नियम
भंग मानला जाईल.
२. या संकेत स्थळावर कोणत्याही प्रकारचा अयोग्य, असामाजिक, निंदाजनक अथवा अश्लील
मजकूर अथवा उत्तान फोटो -चित्रे टाकण्यास मनाई आहे. अशा प्रसंगी सदर मजकूर फोटो वा
चित्र काढून टाकण्याचा अधिकार मंडळाला राहील.
३. संकेत स्थळावरील सभासदांच्या परस्पर संवाद-संपर्काची जबाबदारी सभासदांची असेल.
सभासदांमध्ये कुठल्याही प्रकारे विसंवाद झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
४. कोणतीही तांत्रिक उपकरणे वापरून वा तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून या संकेत
स्थळावर घुसखोरी केल्यास अथवा संकेत स्थळावरील माहितीचा गैरवापर केल्यास तो गुन्हा
मानला जाईल.
५. संकेत स्थळावरील माहिती, मजकूर इत्यादीचे सर्व हक्क मंडळाकडे राहतील सदर
मजकुराचा, माहितीचा इतर ठिकाणी वापर करणे किंवा नक्कल करणे हा नियम भंग मानला जाईल.
६. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय नियम व अटींमध्ये बदल करण्याचे अधिकार मंडळ स्वतःकडे
राखून ठेवत आहे.
७. lagnkara.com वर नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाने वरील अटी व नियम वाचले आहेत आणि
त्यास त्याची मान्यता आहे असे गृहीत धरले जाईल.
खालील परिस्थितीत सभासदाची नोंदणी रद्द करण्यात येईल -
१. सभासद स्वतः ची नोंदणी कधीही रद्द करू शकतो/शकते.
२. वरील कोणत्याही अटींचा भंग केल्याचे आढळल्यास मंडळ सभासदाची नोंदणी रद्द करू
शकते.
३. कोणत्याही परिस्थितीत सभासदत्व रद्द केल्यास/झाल्यास नोंदणी शुल्क परत केले
जाणार नाही.
संकेत स्थळाबद्दल कोणतीही तक्रार अथवा दावा असल्यास तो मुंबईच्या न्यायालयीन कक्षेत
राहील.